Eknath Shinde: ‘बागी 4’; एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडावरून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

'मुन्नाभाई एमबीबीएस', 'वेलकम', 'हेराफेरी' यांसारख्या चित्रपटांमधील कॉमेडी सीन्स आणि डायलॉगवरून हे मीम्स व्हायरल केले जात आहेत. एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र असे हॅशटॅग वापरून हे मीम्स व्हायरल होत आहेत.

Eknath Shinde: 'बागी 4'; एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडावरून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
सोशल मीडियावर मीम्सचा वर्षावImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 1:55 PM

शिवसेनेतील महत्त्वाचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी समर्थक आमदारांसह सूरत गाठल्याने शिवसेना (Shivsena) पक्षात फूट पडणार का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली. विधान परिषदेचा निकाल लागल्यापासूनच एकनाथ शिंदे शिवसेना नेत्यांच्या संपर्कात नव्हते. ते नॉटरिचेबल असून सूरतमधील ली मेरिडियन या हॉटेलमध्ये आमदारांसह थांबले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठा राजकीय भूकंप आल्याची चर्चा होत आहे. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात येणार की काय, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या राजकीय घडामोडी घडत असतानाच सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव होऊ लागला आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, संजय राऊत, अमित शाह अशा विविध राजकीय व्यक्तींवर भन्नाट मीम्स (Memes) व्हायरल होऊ लागले आहेत.

‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘वेलकम’, ‘हेराफेरी’ यांसारख्या चित्रपटांमधील कॉमेडी सीन्स आणि डायलॉगवरून हे मीम्स व्हायरल केले जात आहेत. एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र असे हॅशटॅग वापरून हे मीम्स व्हायरल होत आहेत आणि त्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियासुद्धा येऊ लागल्या आहेत. राज्यात घडणाऱ्या नाट्यमय घडामोडी पाहता नेटकऱ्यांच्याही कल्पनाशक्तीला वेग मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

पहा मीम्स-

एकनाथ शिंदेंनी आपल्याच पक्षाविरोधात पुकारलेलं बंड हा शिवसेनेसाठी सर्वांत मोठा धक्का मानलं जात आहे. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचं सांगितलं जातंय. राष्ट्रवादीवरील नाराजी आणि निधी मिळण्यात होत असलेला अन्याय यामुळे शिंदे यांनी थेट महाविकास आघाडीलाच आव्हान दिल्याचं म्हटलं जात आहे.

एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान संजय राठोड हे शिवसेना नेते मध्यस्थी करणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानावर झालेल्या बैठकीनंतर संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सूरतला पाठवलं जात आहे. संजय राठोड आणि एकनाथ शिंदे यांच्यात एक बैठक होईल आणि शिंदे संध्याकाळी आपला अंतिम निर्णय घोषित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.