मुलाच्या अंगावर पडत होती भिंत, आईकडून छातीचा कोट, मुलगा वाचला, Viral Video पाहाच! 

आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, आई हा एक असा शब्द ज्यामध्ये मायेचा सागर असतो. आई तिच्या मुलांसाठी काहीही करू शकते. सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ शेअर होतात. त्यामधील बहुतेक व्हिडीओ लहान मुलांचे असतात. सध्या सोशल मीडियावर एक आई आणि मुलाचा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

मुलाच्या अंगावर पडत होती भिंत, आईकडून छातीचा कोट, मुलगा वाचला, Viral Video पाहाच! 
व्हायरल व्हिडीओ
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 10:24 AM

मुंबई : आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, आई हा एक असा शब्द ज्यामध्ये मायेचा सागर असतो. आई तिच्या मुलांसाठी काहीही करू शकते. सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ शेअर होतात. त्यामधील बहुतेक व्हिडीओ लहान मुलांचे असतात. सध्या सोशल मीडियावर एक आई आणि मुलाचा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर प्रत्येकजणच म्हणत आहे की, आईची माया काय असते हे या व्हिडीओमधून दिसत आहे. (Mother saves baby’s life Video goes viral on social media)

जगातील प्रत्येक व्यक्तीला हे चांगलेच माहीती आहे की, आई आपल्या मुलासाठी प्रत्येक धोक्याचा सामना करू शकते. याच कारणामुळे आपण रोज ऐकत राहतो की एका आईने आपला जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवला. मात्र, हे आपण आतापर्यंत वाचत आणि ऐकतच आलो आहोत. मात्र, या व्हिडीओमध्ये दिसते आहे की, आई अशाप्रकारे छातीचा कोट करून आपल्या मुलाचे प्राण वाचवते.

या व्हिडीओमध्ये एक महिला एका लहान मुलासह भिंतीजवळ बसलेली दिसते. मात्र, यादरम्यानच ती भिंत अचानक पडताना दिसते. यावेळी ही महिला आपल्या लेकराला वाचवण्यासाठी छातीचा कोट तयार करते आणि सर्व विटा आपल्या अंगावर पडू देते मात्र, लेकराला थोडा धक्का सुध्दा लावू देत नाही. व्हिडीओमध्ये पुढे दिसते आहे की, एक व्यक्ती तिथे लगेचच पळत येते आणि त्या लहान मुलाला घेऊन जाते. त्यानंतर ती महिला देखील उठते.

हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण म्हणत आहे की प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी सुपरहिरोपेक्षा कमी नसते. मुलांवर आलेल्या प्रत्येक संकटाला आई धैर्याने समोर जाते. हा व्हिडिओ भारतीय वन अधिकारी सुशांत नंदा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, या जगाला मातांची गरज आहे. हा व्हिडीओ शेअर होताच लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोक हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर करत आहेत.

संबंधित बातम्या : 

दीड शहाणी नवरी, लग्नाचं सासूला निमंत्रण नाही, सासऱ्याला हृदय विकाराचा झटका, तरीही थाटमाट, एका लग्नाची विचित्र गोष्ट

VIDEO | शिकारीला पाहून गेंड्याला वाचवण्यासाठी पोहोचली आई, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

VIDEO : पळून जाणाऱ्या जोडप्याला पकडलं, गळ्यात टायर टाकून नाचवलं, मध्यप्रदेशातील संतापजनक कृत्य

(Mother saves baby’s life Video goes viral on social media)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.