VIDEO : जब घी सीधी उंगली से ना निकले तो…! मेट्रोमध्ये जागा मिळवण्यासाठी मुलीने केला खतरनाक स्टंट, तरूणालाही मिळाली शिक्षा!
बस, रेल्वे, लोकल किंवा मेट्रो (Metro) असो...तरूणी बसण्यासाठी जागा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवतात. असाच एक खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. एका तरूणीने मेट्रोमध्ये जागा मिळवण्यासाठी खास स्टंट (Stunt) करून आजूबाजूच्या लोकांना आश्चर्यचकित केले.
मुंबई : बस, रेल्वे, लोकल किंवा मेट्रो (Metro) असो…तरूणी बसण्यासाठी जागा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवतात. असाच एक खास व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. एका तरूणीने मेट्रोमध्ये जागा मिळवण्यासाठी खास स्टंट (Stunt) करून आजूबाजूच्या लोकांना आश्चर्यचकित केले. मात्र, आता ही तरूणी सोशल मीडियावर चांगलीच फेमस झाली आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातल आहे.
मेट्रोमध्ये तरूणीचा खास स्टंट
त्याचे झाले असे की, एक तरूणीनी मेट्रोमध्ये येते. तिला बसण्यासाठी जागा दिसते परंतू एक तरूण त्याचे काही साहित्य बाजूच्या सीटवर ठेवून बसतो. तरूणी पुढे येते, मात्र तो तिला जागा देत नाही. इतरही बरेच प्रवासी उभे राहूनच मेट्रोमध्ये प्रवास करत आहेत. मात्र, या तरूणीने बसण्यासाठी सुरूवातीला खांब्याच्या मदतीने पायवर करत एक स्टंट केला. मात्र, तरीही तो तरूण काही जागा देत नाही आणि मठ्ठ सारखा पाहत राहतो.
View this post on Instagram
ती तरूणी दोन्ही पाय जमीनीवर पसरून खाली बसून एक स्टंट परत करते. मात्र, मग तो तरूण घाबरूनच या तरूणीला जागा देतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, जेव्हा कोणी आदराने सीट सोडत नाही, तेव्हा असेच करणे योग्य आहे. तर दुसरीकडे युजरने लिहिले की, सीट मिळविण्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग असू शकत नाही. याशिवाय इतर अनेकांनी मुलीसाठी बुद्धिमान, स्मार्ट असे शब्द वापरले.
प्रवाश्यांनी केले तरूणीचे काैतुक
हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. dailygameofficialनावाच्या पेजवर तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ शेअर करताना पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, त्या व्यक्तीची प्रतिक्रिया पाहा. हा व्हिडिओ 27 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो कमेंट्सही पाहिल्या जात आहेत. तसेच यामुलीचे काैतुकही अनेकांनी केले आहे.
संबंधित बातम्या :