Viral Video: काय सांगता? चोराच्याच घरी चोरी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
38 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 30 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईकही केला आहे.
आजकाल चोरी, पाकिटमारी, दरोडे यांसारख्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे. अनेकदा दिवसाढवळ्याही लुटण्याच्या घटना घडत आहेत. अनेकदा हे चोरटे दुचाकीवरून येतात आणि रस्त्यावर चालणाऱ्या लोकांच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतात किंवा सोनसाखळी चोरून पळून जातात. अशा चोरांपासून (Theives) सावध राहण्याची गरज आहे. पण चोराच्या घरीच चोरी झाल्याचं कधी ऐकलंत का तुम्ही? सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ खूपच मजेदार असून त्यावर अनेक हास्यास्पद कमेंट्स येत आहेत.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कारजवळ उभे असलेले दोन जण हे त्यांच्या मोबाइलवर काहीतरी पाहत आहेत. तेवढ्यात दुचाकीवरील दोन लोक त्यांच्याजवळून जातात. यानंतर थोडे पुढे गेल्यावर तो दुचाकी मागे वळवून त्याच ठिकाणी येतो, जिथे दोघंही मोबाईलमध्ये पाहत उभे होते. दुचाकीस्वार त्यांना चाकू दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्याकडून मोबाईल हिसकावून घेतात, पण त्यांना काय माहीत की ते त्यांच्यापेक्षा मोठे चोर आहेत आणि ते चाकूऐवजी बंदूक वापरतात. दुचाकीस्वार चोर हे बंदुक पाहून घाबरतात. त्याचवेळी मोबाईल चालवणारे चोरटे बंदुकीच्या जोरावर त्या चोरट्यांकडून चाकू, टोप्या आणि दुचाकी हिसकावून लगेच तेथून पसार होतात.
पहा व्हिडीओ
The tables turn ? pic.twitter.com/PrcAEpX8w7
— Vicious Videos (@ViciousVideos) August 14, 2022
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर व्हाइसियस व्हिडिओज नावाच्या आयडीने शेअर करण्यात आला आहे. 38 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 30 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईकही केला आहे. त्यावर विविध प्रतिक्रियाही येत आहेत. तर काहीजण हा व्हिडीओ फेक असल्याचं सांगत आहेत.