VIDEO | आपली आई आपल्यासाठी ग्रेटच आहे हो.. पण नेटिझन्सनी कुणाला केलंय मदर ऑफ द इयर ? पाहा व्हिडीओ..
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, स्विमिंग पूलजवळ एक लहान मुलगा खेळत आहे. मात्र, खेळता खेळता तो अचानक स्विमिंग पूलजवळ जाऊन पूलमध्ये उडी मारतो. या मुलगा अतिशय लहान आहे आणि त्याला स्विमिंग देखील करता येत नाही. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्या मुलाची आई एका सुपरमॉम होऊन लगेचच आपल्या मुलाला वाचते.
मुंबई : या जगात सर्वात जास्त प्रेम आपल्या मुलांवर कोण करत असेल तर ती आई असते. आई (Mother) आपल्या मुलांसाठी हवे ते करते. वेळ आली तर आई आपल्या मुलांसाठी प्राण्याची आहुती देण्यासही माने हटत नाही. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ (Video) व्हायरल होतात. मात्र, काही व्हिडीओ इतके जास्त भावनिक असतात की ते पाहिल्यावर आपल्या डोळ्यांमधून चटक पाणी घेते. सध्या अशाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral) होताना दिसतो आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक आई आणि मुलगा दिसतो आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर प्रत्येकालाच समजेल की, आई आपल्या मुलांवर किती जास्त प्रेम करते.
स्विमिंग पूलमध्ये घेतली मुलाने उडी
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, स्विमिंग पूलजवळ एक लहान मुलगा खेळत आहे. मात्र, खेळता खेळता तो अचानक स्विमिंग पूलजवळ जाऊन पूलमध्ये उडी मारतो. या मुलगा अतिशय लहान आहे आणि त्याला स्विमिंग देखील करता येत नाही. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्या मुलाची आई एका सुपरमॉम होऊन लगेचच आपल्या मुलाला वाचते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. कारण अचानक तो मुलगा स्विमिंग पूलमध्ये उडी घेतो आणि त्यापेक्षाही फास्ट येऊन ती आई आपल्या मुलाला वाचते.
आई आणि मुलाचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ इथे पाहा
Mother of the year!? pic.twitter.com/TIXn8P85gx
— Figen (@TheFigen) April 30, 2022
हा व्हिडिओ @TheFigen या हँडलवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शन दिले आहे, ‘मदर ऑफ द इयर’ हा 9 सेकंदाचा व्हिडिओ 1 मे रोजी अपलोड करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडिओला 4 लाख 77 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 14 हजारांहून अधिक लोकांनी या पोस्टला लाईक केले आहे. एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, ही सुपरमॉम आहे, तर दुसऱ्या युजरने कमेंट करताना लिहिले आहे, आई या नावामध्येच खूप मोठी पावर आहे. आई आपल्या मुलांना संकटामधून बाहेर काढण्यासाठी काहीही करू शकते.