Viral video : चिमुरडीने आपल्या रिपोर्टिंगने युजर्सचे मन जिंकले, नेटकरी कमेंट करून म्हणाले …
सोशल मीडिया (Social media) हे एक मोठे व्यासपीठ आहे. येथे एखादा व्यक्ती एकाच रात्रीमध्ये फेसम होतो. सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, त्यामध्ये जास्त करून लहान मुलांचे आणि प्राण्यांचे व्हिडीओ लोकांना जास्त आवडतात.
मुंबई : सोशल मीडिया (Social media) हे एक मोठे व्यासपीठ आहे. येथे एखादा व्यक्ती एकाच रात्रीमध्ये फेसम होतो. सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, त्यामध्ये जास्त करून लहान मुलांचे आणि प्राण्यांचे व्हिडीओ लोकांना आवडतात. अनेकदा तुम्हाला सोशल मीडियावर लहान मुलांचे मजेदार व्हिडिओ बघायला मिळाले असतील. सध्या असाच एका लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
कश्मीरमधील लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल
कश्मीरमधील एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगी हातात माइक घेऊन रिपोर्टिंग करत आहे. मुलीच्या मागे खराब रस्ता दिसतो आहे. व्हिडिओमध्ये मुलगी म्हणतेय की हा रस्ता खूप खराब झालेला आहे. दोन्ही बाजूंनी रस्ता कसा खराब आहे हे ती सांगते. हळूहळू ती आपल्या प्रेक्षकांना रस्त्याची झालेली दुरअवस्था दाखवण्याची प्रयत्न करते. इतकेच नाहीतर तर ती हेही सांगते की, खराब झालेल्या रस्त्यामुळे घरी कोणी नातेवाईक देखील येऊ शकत नाहीत.
Meet Youngest reporter from the #Kashmir Valley. pic.twitter.com/4H6mYkiDiI
— Sajid Yousuf Shah (@TheSkandar) January 9, 2022
हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. Sajid Yousuf Shah नावाच्या पेजवर तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ शेअर करताना पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले – #Kashmir Valley च्या सर्वात तरुण पत्रकाराला भेटा. या लहान मुलीचे लोक खूप कौतुक करत आहेत. तसेच काही लोक म्हणत आहेत की ही बातमी सांगितल्याबद्दल छोट्या रिपोर्टरचे आभार. आत्तापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि कौतुक केले आहे.
संबंधित बातम्या :
Video | रेडा थेट आला अन् थेट हल्ला केला, रेस्टॉरंटमधील माणूस गंभीर जखमी, व्हिडीओ व्हायरल
Viral Video | अशी BMW कार कधी पाहिलीत का, नेटकरी हसून हसून लोटपोट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
(Video of little girl reporting goes viral on social media)