VIDEO : स्टेजवर पैसे उडवतानाचा उत्साह नडला आणि भाऊ थेट नवरदेवाच्या मांडीवर पडला, पाहा लग्नातील खतरनाक व्हिडीओ!
दररोज सोशल मीडियावर (social media) हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, विशेष: लोकांना लग्नातील व्हिडीओ बघायला आवडतात. आपला लग्नसोहळा (wedding) हा थाटामाटात पार पडावा असे प्रत्येकालाच वाटते. त्यासाठी लग्नामध्ये वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात.
मुंबई : दररोज सोशल मीडियावर (social media) हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, विशेष: लोकांना लग्नातील व्हिडीओ बघायला आवडतात. आपला लग्नसोहळा (wedding) हा थाटामाटात पार पडावा असे प्रत्येकालाच वाटते. त्यासाठी लग्नामध्ये वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. सध्या सोशल मीडियावर लग्नातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्हीही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाहीत. युजर हा व्हिडीओ परत-परत बघत आहेत.
नवरदेवाचा मित्र पैसे उधळताना थेट पडला खाली
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, लग्नाच्या स्टेजवर नवरदेव आणि नवरी बसले आहेत. आपल्या मित्राचे लग्न झाल्याचा नवरदेवाच्या मित्रांना इतका आनंद झाला आहे की, नवरदेवाचे दोन्ही मित्र चक्क स्टेजवर नवरदेव आणि नवरीच्या जवळ पैसांची उधळण करत आहेत. हे पाहून नवदेव आणि नवरी देखील खूप आनंदी आहेत. मात्र, याचदरम्यान उत्साहाच्या भरामध्ये नवरदेवाचा मित्र त्याच्याजवळ बसण्याचा प्रयत्न करतो आणि तो थेट नवरदेवाच्या अंगावर पडतो. हे पाहून तेथे उपस्थित असलेल्यांना हसू आवरत नाही.
View this post on Instagram
हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘लग्नाच्या दिवशी मित्रासोबत असे कोण करतो, भाऊ.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘काहीही करा, हा मित्र कधीच सुधरणार नाही.’ यावर अनेक युजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या. हा व्हिडिओ (Instagram Reels Video) ‘divusharm_9andamitchhaniwala’ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
Video : डेव्हिड वॉर्नरच्या मुलीही म्हणतायत ‘सामी-सामी’, डान्स पाहून अल्लू अर्जुनही झाला खुश