Viral Video: झोमॅटो डिलिव्हरी बॉयला महिलेकडून चपलेनं मारहाण; व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. काहीजण झोमॅटोने अशा महिलांवर कारवाई करावी, असं म्हणत आहेत, तर काहीजण झोमॅटोला आपल्या डिलिव्हरी बॉईजची काळजी नसल्याची तक्रार करत आहेत.

Viral Video: झोमॅटो डिलिव्हरी बॉयला महिलेकडून चपलेनं मारहाण; व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
Viral Video: झोमॅटो डिलिव्हरी बॉयला महिलेकडून चपलेनं मारहाणImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 10:57 AM

सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतात. काही व्हिडीओ आश्चर्यकारक असतात तर काही धक्कादायक. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला झोमॅटो (Zomato) फूड डिलिव्हरी बॉयला चपलेनं मारहाण करताना दिसत आहे. डिलिव्हरी बॉय ऑर्डर देण्यासाठी जात होता, मात्र वाटेतच एका महिलेने त्याला चपलेनं मारहाण करण्यास सुरुवात केली. यामागचं नेमकं कारण काय होतं, हे अद्याप समजू शकलेलं नाही. संबंधित महिला मारत असताना तिथे उभे असलेले दुसरे डिलिव्हरी बॉय (Zomato Delivery Boy) शांतपणे हे सर्व पाहत होते. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हा व्हायरल व्हिडिओ 16 ऑगस्टचा आहे, जो @bogas04 नावाच्या आयडीवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. असा दावा करण्यात आला आहे की डिलिव्हरी बॉय त्याची ऑर्डर घेऊन जात होता, परंतु महिलेनं त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना एका व्यक्तीने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केली. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, ‘महिलेनं त्याच्याकडून ऑर्डर घेतली आणि त्याला चपलेनं मारण्यास सुरुवात केली. तो माझ्या घरी रडत रडत आला आणि त्याला भीती वाटली की त्याची नोकरी जाऊ शकते.’

हे सुद्धा वाचा

पहा व्हायरल व्हिडीओ-

ही घटना कुठे घडली, याचा उल्लेख व्हिडिओमध्ये करण्यात आलेला नाही. त्याचवेळी ही महिला कोण होती, डिलिव्हरी बॉयला चपलेनं का मारत होती याचीही माहिती अद्याप मिळालेली नाही. तसंच महिलेवर कारवाई झाली की नाही, हेसुद्धा कळू शकलेलं नाही. अवघ्या 45 सेकंदांचा हा व्हिडीओ आश्चर्यचकित करणारा आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर झोमॅटो केअरकडूनही रिप्लाय आला आहे की आम्ही त्याची चौकशी करत आहोत, पण त्यानंतर कोणतेही अपडेट नाहीत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. काहीजण झोमॅटोने अशा महिलांवर कारवाई करावी, असं म्हणत आहेत, तर काहीजण झोमॅटोला आपल्या डिलिव्हरी बॉईजची काळजी नसल्याची तक्रार करत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.