VIDEO : तरूणाने ‘गुड नाल इश्क मीठा’वर केला स्टेज फाडू परफॉर्मन्स, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले…
हळदी, मेहंदी, संगीत, विदाईपासून ते लग्नाच्या प्रत्येक विधीपर्यंतचे विविध व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात. विशेष म्हणजे यूजरलाही लग्नातील (Wedding) काही हटके व्हिडीओ बघायला प्रचंड आवडतात. आजकालच्या लग्नांमध्ये संगीत समारंभ मोठ्या थाटामाटात केला जातो.
मुंबई : हळदी, मेहंदी, संगीत, विदाईपासून ते लग्नाच्या प्रत्येक विधीपर्यंतचे विविध व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात. विशेष म्हणजे यूजरलाही लग्नातील (Wedding) काही हटके व्हिडीओ बघायला प्रचंड आवडतात. आजकालच्या लग्नांमध्ये संगीत समारंभ मोठ्या थाटामाटात केला जातो. या संगीत समारंभामध्ये नवरदेव आणि नवरीच्या नातेवाईकांपासून मित्र-मैत्रिणींपर्यंत जवळपास सर्वजण डान्स करतात.
तरूणाचा स्टेज फाडू परफॉर्मन्स!
सध्या एका लग्नातील संगीत समारंभामधील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसते आहे की, दोन मुली गूड नाल इश्क मीठा या गाण्यावर डान्स करत आहेत. या दोघींचा डान्स सुरू असतानाच एका तरूणाची या डान्समध्ये धडाकेबाज एन्ट्री होते. त्या तरूणाचा उत्साह आणि जोश पाहून तेथे उपस्थित असलेल्यांना आर्श्चय होते. तरूण एका खास शैलीमध्ये डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर यूजरला हा व्हिडीओ प्रचंड आवडत आहे.
View this post on Instagram
सोशल मीडिया यूजर्सना डान्स परफॉर्मन्स खूपच मजेदार वाटत आहे. एका युजरने लिहिले आहे की, किती सुंदर व्हिडिओ आहे, तर दुसऱ्या युजरने लिहिले की, खरोखरच हा तरूण खूपच भारी डान्स करत आहे. याशिवाय इतर अनेक यूजर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडिओ indianfamousdancers’s नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 1.60 लाखांहून अधिक वेळा बघितला गेला आहे.
संबंधित बातम्या :
Video : नर्सचा जबरदस्त डान्स बघून लकवा भरलेला पेशंटही लागला नाचू, व्हिडिओ तुफान व्हायरल
Video : हाताची मूठ उघडताच मिळालं हटके सरप्राईज, चिमुकल्याच्या स्माईलने करोडो घायाळ