धर्मराव बाबा अत्राम
अजितदादा गटाचे नेते धर्मरावबाबा अत्राम अहेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यांच्याविरोधात त्यांचीच मुलगी भाग्यश्री अत्राम ही शरद पवार गटातून लढत आहे. या सीटवर राष्ट्रवादीचा पर्यायाने धर्मरावबाबा यांचा मोठा दबदबा राहिला आहे. त्यामुळे आता बापलेकीच्या या संघर्षात कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अहेरी विधानसभा मतदारसंघात एकूण 806353 मतदार आहेत. त्यात 406726 लाख पुरुष आणि 399618 महिला मतदार आहेत. तसचे 9 तृतियपंथी आहेत. अहेरीत यावेळी 950 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.
हा मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. नक्षलवाद्यांनी हल्ला करू नये, मतदान केंद्र ताब्यात घेऊ नये म्हणून हा बंदोबस्त ठेवला जातो. अहेरी हा एसटी राखीव मतदारसंघ आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच बापाविरुद्ध लेक उभी आहे. भाग्यश्री अत्राम या गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत.