संजय राऊत आणि शरद पवार भेट व्हाया उद्धव ठाकरे! राजकीय विश्लेषकांच्या मते गाठीभेटीचं कारण काय?

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास दीड तास बैठक झाली. त्यानंतर संजय राऊत थेट शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर पोहोचले. राऊत आणि पवारांमध्येही जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली.

संजय राऊत आणि शरद पवार भेट व्हाया उद्धव ठाकरे! राजकीय विश्लेषकांच्या मते गाठीभेटीचं कारण काय?
संजय राऊत, उद्धव ठाकरे, शरद पवार
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 5:42 PM

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटींचा सिलसिला लावला आहे. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास दीड तास बैठक झाली. त्यानंतर संजय राऊत थेट शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर पोहोचले. राऊत आणि पवारांमध्येही जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, कोणत्याही राजकीय घडामोडी सुरु नसल्याचं म्हटलंय. (Sanjay Raut meet CM Uddhav Thackeray and Sharad Pawar, Opinions of political analysts)

संजय राऊत काय म्हणाले?

सहज भेटलो, काहीही घडामोडी नाहीत, मुख्यमंत्र्यांचा काही निरोप असेल तर तुम्हाला कशाला सांगू, पवार साहेबांना सांगेन, हे सरकार ५ वर्ष पूर्ण करेल, उद्धव ठाकरे चांगलंकाम करत आहेत असं शरद पवारांनी म्हटलं आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात या सरकारचं काम चालेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी सिल्व्हर ओकवरुन बाहेर आल्यानंतर दिली.

राजकीय विश्लेषकांच्या मते भेटीगाठीची कारणं कोणती?

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर लगेचच ते शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. म्हणजे संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊनच शरद पवार यांच्या भेटीला गेले हे तर नक्कीच आहे. पण त्यामागे महाविकास आघाडी सरकार अस्थिर आहे किंवा पवार आणि ठाकरे यांच्यात काही बेबनाव असेल असं नाही. तर पावसाळी अधिवेशन तोंडावर आलं आहे. या अधिवेशनातील महत्वाचे मुद्दे, प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र, त्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने बजावलेलं समन्स, अनिल परब यांच्या अडचणीत झालेली वाढ, असे काही मुद्दे या भेटीगाठींमागे असून शकतात असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

‘महाविकास आघाडी सरकार टिकेल’

दुसरीकडे या भेटीगाठीचा सिलसिला म्हणजे महाविकास आघाडी सरकारला धोका आहे, असं म्हणता येणार नाही. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी शिवसेना हा विश्वासू पक्ष असल्याचं म्हटलं होतं. तसंच महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकेल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढत असल्याचं मत शरद पवार यांनी कालच व्यक्त केलं आहे. दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनीही महाविकास आघाडीमध्ये कोणतीही संभ्रमावस्था नसल्याचं म्हटलंय. तसंच सरकार 5 वर्षे टिकेल असा दावाही त्यांनी केलाय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला धोका आहे, असं म्हणता येणार नसल्याचंही राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांसोबत तब्बल दीड तास चर्चा, पण 20 मिनिटात पवारांची भेट घेऊन संजय राऊत परतले

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर लगेचच संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, महाविकास आघाडीत चाललंय काय?

Sanjay Raut meet CM Uddhav Thackeray and Sharad Pawar, Opinions of political analysts

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.