कपिल पाटील लोकसभा निवडणूक निकाल 2024
कपिल पाटील यांचा जन्म 5 मार्च 1961 रोजी ठाणे जिल्ह्यातील दिवे अंजुर या गावात झाला. कपिल पाटील यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद भुषविले. तसेच काही काळ ते ठाणे जिल्हा परिषदेचे सभापतीही होते.
कपिल पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भुषवलं. पुढे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 व 2019 मधील भिवंडी लोकसभा मतदार संघातून दणदणीत विजयही त्यांनी संपादित केला होता. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असल्याने त्यांनी अल्पावधीतच भाजपामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.